shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रीडा ,वाढदिवस आणि संस्कृती चा त्रिवेणी* *संगम बनसुडे विद्यालयात*

*क्रीडा ,वाढदिवस आणि संस्कृती चा त्रिवेणी* *संगम बनसुडे विद्यालयात* 
इंदापूर: पळसदेव- येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयात संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ व २७ डिसेंबर रोजी आंतरशालेय व वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
याचवेळी नाताळ सणही मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. सीनियर केजी व इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी नाताळ तसेच कार्याध्यक्षा नंदाताई यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्री-प्रायमरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.प्री-प्रायमरी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग, फ्रॉग जम्प,बॉल हायडिंग, कोन कलेक्ट रेस, बुक बॅलन्स, लेमन स्पून व सॅक रेस अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो व क्रिकेट या सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील एकूण विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले, तर सांघिक स्पर्धेतील  विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण 200 प्रमाणपत्र व २१ ट्रॉफी वितरण करण्यात आले.कार्यक्रमासाठी शिक्षिका सोजर काळे व स्नेहल सुतार यांनी आकर्षक रांगोळी साकारली होती.
कार्यक्रमास संस्थाअध्यक्षआदरणीय हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा आदरणीय नंदाताई बनसुडे,सचिव नितीन बनसुडे, सदस्य अर्चनाताई बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे, विभागप्रमुख तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वंदना बनसुडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती मारकड, प्रकाश दरदरे व प्रवीण मदने यांनी केले. सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
close