shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“एरंडोल रन मॅरेथॉन 2.0” — आरोग्य जागृतीसाठी शहर धावणार.

“एरंडोल रन मॅरेथॉन 2.0” — आरोग्य जागृतीसाठी शहर धावणार.

११ जानेवारीला पहाटे ५ वाजता भव्य मॅरेथॉन; नोंदणी केंद्रे जाहीर, विद्यार्थ्यांना विशेष सवलत.

एरंडोल शहरात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “एरंडोल रन मॅरेथॉन 2.0” या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. “एक तास आरोग्यासाठी” या संकल्पनेतून मैत्री सेवा फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन व बालाजी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन दुसऱ्या वर्षी आयोजित होत असून, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ५ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. या मॅरेथॉनची सुरुवात टेनिस क्लब, एरंडोल येथून होईल.

मागील वर्षी या मॅरेथॉनला नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास २८९० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या उपक्रमाला यशस्वी केले होते. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीही एरंडोल शहरासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी व धावपटू मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

*शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह*  *“एरंडोल रन मॅरेथॉन 2.0” — आरोग्य जागृतीसाठी शहर धावणार.*  https://www.shirdiexpress.com/2025/12/20_29.html  *"बातमी पेक्षा नाते महत्त्वाचे"*   श्री. प्रमोद चौधरी *शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह*

या मॅरेथॉनसाठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी केवळ १०० रुपयांत नोंदणीची विशेष सवलत देण्यात आली आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना उच्च प्रतीचे टी-शर्ट, सहभाग मेडल, बॅग व अल्पोपहार देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

स्पर्धा पुरुष व महिला गटांमध्ये स्वतंत्रपणे घेण्यात येणार असून, विविध वयोगटांसाठी ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा अंतराच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना ५,१०० रुपये, ३,१०० रुपये व २,१०० रुपये अशी आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मॅरेथॉनसाठी नोंदणीची अंतिम तारीख २ जानेवारी २०२६ असून, ऑफलाईन नोंदणीसाठी एरंडोल शहरात खालील केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती निवेदनाद्वारे आयोजकांनी दिली आहे.

ऑफलाईन नोंदणी केंद्रे.

1. मैत्री ग्राहक सेवा केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, एरंडोल

📞 96738 68883


2. मेट्रोपोलीस पॅथॉलॉजी, माळीवाडा कॉर्नर, मेन रोड, एरंडोल

📞 88886 56640


3. एम. एस. कन्स्ट्रक्शन, बाबासाहेब आंबेडकर चौक, एरंडोल

📞 70387 93444


4. अंबिका मेडिकल, जयहिंद चौक, गांधीपुरा, एरंडोल

📞 90962 39684


अधिक माहितीसाठी

📞 91582 96962 | 82083 06730

या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून निरोगी व सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणारा सामाजिक उपक्रम असल्याने नागरिकांनी, युवकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

close