shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"भीमवंदना"

जयभीम जयभीम नायक आमुचा
बहुजन भाग्यविधाता

माता भीमाई पिता रामजी,
दीनदुबळ्यांचा त्राता
 
अस्पृशांच्या स्वतंत्र्यास्तव
लढा तुम्ही चेतविला

सामाजिक अन् राजकीय ही,
हक्कांसाठी लढला...

मिळवून सारे हक्क मानवी
दीनां दिला अधिकार,

या कार्याच्या पूर्तीसाठी,
आम्हीच हो लढणार,
 
ऐसा राजा बुद्ध कलीयुगी, 
पुन्हा नाही होणार

स्मरण तयाचे आज गर्जू या
जयभीम.. जय भीम.. जयभीम
जयभीम, जयभीम, जयभीम,
भारतमाता की जय !!!

*रचनाकार : चंद्रकांत शहासने*:( प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र गाथा भीमरावांची हे ३५०० ओव्यांमध्ये काव्यबद्ध करणारे महाकवी.)
मो. ९८८१३७३५८५
close