माय एस्टीची कहाणी
कैसे सांगू तुला बाई
किती कितीक आठवणी
मनी रुंजती नांदती ।। १
एस्टी प्रवासाच्या कथा
किती कितीक रंजक
आठवती ते दिवस
शिक्षणाचा होता ध्यास ।।२
रोज भल्याच पहाटे
एस्टी गाडीचा प्रवास
माझ्या कॉलेज विश्वाची
एस्टी मोठीच आठवण।।३
करण्या नोकरी व्यवसाय
गावोगावची भ्रमंती
फक्त एस्टीचा भरोसा
लाखमोलाची सोबती ।।४
येता लगीन सराई
एस्टी वऱ्हाडाला नेई
सारे नटती सजती
मग एस्टीही सजविती ।।५
एस्टी पुढेच नाचती
गात वरातीची गाणी
आठवणी वधूवर
जन्मभर जोपासती ।।६
माझ्या शाळेची सहल
एस्टी नेते दूरवर
किल्ले मंदिरे शहरे
रोज नविन ढमाल ।।७
धामधूम इलेक्शन,
मतपेट्यां वाहतूक
एस्टी देई भरवसा,
सारं वेळेत होणार।।८
©️ रचनाकार चंद्रकांत शहासने.
पुणे, मो. ९८८१३७३५८५