इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाच्या  अध्यक्षपदी किसन  भोंग  यांची निवड.
इंदापूर:    हिंदी अध्यापक संघ इंदापूर तहसील नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया 
बुधवार दि. 11जून 2025 रोजी केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव - केतकी येथे संपन्न झाली. 
 सदर निवड प्रक्रियेत  मागील वर्षीच्या कार्याबद्दल आढावा घेण्यात आला. तसेच माझी अध्यक्ष  शत्रुघ्न कानगुडे सर यांना निरोप देण्यात आला.  
इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाचे माजी सचिव तसेच मागील 30 वर्षापासून हिंदी विषयाची सेवा करणारे   श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव-केतकीचे किसन धोंडीबा भोंग सर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी   छत्रपती हायस्कूल, भवानीनगर चे दीपक जगन्नाथ निंबाळकर,यांची निवड करण्यात आली. 
कार्याध्यक्षपदी  सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, अंथूर्णेतील दत्तात्रय विठ्ठल वाघ यांची निवड करण्यात आली. सचिव पदी संजीवकुमार अर्जुन पांढरे, श्री काटेश्वर विद्यालय काटी यांची निवड करण्यात आली. 
    तसेच कार्यकारणी मध्ये नवीन सदस्य निवड करण्यात आली. यामध्ये  मीनानाथ कौटी,  शहंशाह मुजावर, सौ.एस.एन. गायकवाड, सौ. वर्षाराणी गाडे, शंकर रणमोडे यांची निवड करण्यात आली.

ही निवड महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ सदस्य उस्मान मुलांनी सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ सदस्य राजेंद्र रणमोडे सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ समन्वयक  सुधाकर भोंग सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपस्थित कार्यकारणी  सदस्यांच्या सहविचारातून  नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.