इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा डॉ. अनिल शिर्के यांची निवड.
उपाध्यक्ष पदी डॉ. रोहिदास थोरवे,
सेक्रेटरी पदी डॉ. सुधीर तांबिले, खजिनदार पदी डॉ. महेश रुपनवर यांची निवड.
इंदापूर : इंदापूर तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अनिल शिर्के यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सन 2024- 25 या कालावधीतील इंदापूर तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यानंतर सन 2025 26 या कार्यकाळातील निवड प्रक्रियेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अविनाश पाणबुडे यांनी निपक्ष पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली. यामध्ये पेट्रोन डॉ. राम अरणकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी निवडणूक निकाल घोषित केला.
यामध्ये सलग दुसऱ्यांदा डॉ. अनिल शिर्के यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून उपाध्यक्ष पदी डॉ. रोहिदास थोरवे, सेक्रेटरी पदी डॉ. सुधीर तांबिले, खजिनदार पदी डॉ. महेश रुपनवर यांची निवड करण्यात आली तर नियोजित अध्यक्ष 2026 27 साठी डॉ. अभिजीत ठोंबरे यांची निवड करण्यात आली.
अधिक माहिती घेताना डॉ. अनिल शिर्के म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशन हे डॉक्टरांची एकजुटता अबाधित राखण्यासाठी तसेच एकजुटीतून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकजुटीने काम करण्यासाठी असून या माध्यमातून रक्तदान शिबिरे, सर्व रोग निदान शिबिरे, डॉक्टरांची कार्यशाळा,लसीकरण कॅम्प, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, पॅनल चर्चासत्र,जेष्ठ नागरिकांसाठीचे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, अवयवदान कॅम्प, पालखीतील वारकऱ्यांसाठी रुग्ण तपासणी व औषध वाटप, रुग्ण आणि डॉक्टरांचा सुसंवाद कार्यशाळा, डिझास्टर मॅनेजमेंट, वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम या माध्यमातून इंदापूर तालुका इंडियन मेडिकल असोसिएशन पार पाडत असते.