shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयतच्या कदम विद्यालयात शिक्षकांना कृत्रिम बु्धिमत्ता (AI )चे प्रशिक्षण.

*रयतच्या कदम विद्यालयात शिक्षकांना कृत्रिम बु्धिमत्ता (AI )चे प्रशिक्षण.
इंदापूर : रयत शिक्षण संस्था नेहमीच संस्थेत वेगवेगळे उपक्रम राबवत असते.नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते.संस्थेने सर्व शाखेमध्ये डिजिटल क्लासरूम ही संकल्पना राबवली असून सर्व शिक्षक व विद्यार्थी इंटरऍक्टिव्ह  पॅनलद्वारे अध्ययन अध्यापन करत आहेत.अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजंट याचा सर्व ठिकाणी वापर केल्याचे दिसून येते. भविष्यात याची असणारी मागणी विचारात घेऊन रयत शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार यावर्षीपासून विषय सुरू करण्यास सांगितला असून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,सचिव विकास देशमुख,सहसचिव बी.एन.पवार व लाईफ मेंबर बोर्डाने तात्काळ निर्णय घेऊन या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाखांमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या विषयाचे ज्ञान देण्याचे ठरवले आहे.त्याचाच भाग म्हणून शाळा भरण्यापूर्वी सर्व शिक्षकांना पाच दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये सर्व शिक्षकांना आर्टिफिशियल इंटेलिजंट विषयाचे प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दिनांक 9 जून ते 13 जून या कालावधीत होत असून या मध्ये Artificial intelligence, Machine Learning, Internet of thing, Robotic,Drones ,Data Analysis,Paythan Programing इत्यादी विषयी पीपीटी व व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.तसेच AI चे अध्यापनात कसा वापर करावा याचे प्रात्यक्षिक करून घेतले जात आहे. संस्था पातळीवर प्रशिक्षण घेऊन नीलकंठ शिंदे व वर्षा नागणे हे सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.या  कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी प्रशिक्षणाची गरज विषद करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.
close