श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सातारा - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सातारा येथील केंद्रात शिक्षण घेणारी तारळे गावची विद्यार्थिनी समीक्षा चंद्रकांत चव्हाण हिने वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत ७१.५० टक्के गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळविले आहे. तिच्या या यशाबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी तिचे अभिनंदन केले आहे..
समीक्षा चव्हाण ही छत्रपती शिवाजी कॉलेज च्या मराठी विभागाची विद्यार्थिनी असून तिने वक्तृत्व,गायन,लेखन, साहित्य लेखन, सूत्र संचालन इत्यादी विविध कला प्रकारात कौशल्य आत्मसात केले आहे. आर्थिक परिस्थिती जरी चांगलीं नसली तरी आत्मविश्वास पूर्वक अभ्यास करून स्वतःच्या क्षमता वाढण्यासाठी ती सतत प्रयत्न करीत ती झुंज देत आहे. केवळ गुण मिळवणे या पेक्षाही कौशल्याने सिद्ध होणे हे तिचे तिला आवडते. विविध प्रकारच्या लेख आणि बातम्या याद्वारे साताऱ्यातील विविध वर्तमानपत्रात लेखन केले आहे. समजात घडणाऱ्या विविध प्रकाराच्या गोष्टींवर कटाक्ष टाकून त्या गोष्टी आपल्या भाषेत मांडता यायला हव्यात यावर तिचा कायम भर असतो.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सातारा केंद्राचे मधुसूदन पतकी सर आणि जयंत लंगडे सर यांनी तिला अध्यापन आणि मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे सर, प्रा.डॉ. आबासाहेब उमाप सर, प्रा.डॉ. विद्या नावडकर मॅडम, प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे सर, प्रा. श्रीकांत भोकरे सर, प्रा.प्रियांका कुंभार मॅडम इत्यादीनी प्रोत्साहन दिले आहे.
समीक्षा हिच्यावर सध्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावात अनेकांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111