shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"चिमुकल्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी दिंडी संपन्न – रा.हि. जाजू शाळेतील भक्तिमय सोहळा".

"चिमुकल्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी दिंडी संपन्न – रा.हि. जाजू शाळेतील भक्तिमय सोहळा".

एरंडोल – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रा.हि. जाजू प्राथमिक विद्यामंदिर, एरंडोल येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळेतील सर्व चिमुकले विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या गजरात शाळेच्या परिसरातून गावात ही दिंडी काढण्यात आली.

दिंडीत विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करत पारंपरिक फुगड्या सादर केल्या. मुलींच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे काही शिक्षकही वारकरी वेषात सहभागी होत विद्यार्थ्यांमध्ये आनंद द्विगुणित केला.

या भक्तिपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे यश मुख्याध्यापिका सौ. जयश्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधु-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाच्या सहकार्याने मिळाले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील विठूनामाचा आनंद पाहून उपस्थितांचे मन हरखून गेले.

या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव आणि पारंपरिक मूल्यांची रुजवण करण्यात शाळेला यश मिळाले.


close