shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आसराबाई गोर्डे यांचे वृद्धापकाळाने निधन; कै. काशिनाथ गागरे यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम स्थगित


शिर्डी येथील रंभाजी काशिनाथ गागरे यांच्या आत्या गं. भा. आसराबाई मारुती गोर्डे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गोर्डे व गागरे परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेमुळे गागरे कुटुंबात नियोजित असलेला धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
रंभाजी गागरे यांचे वडील कै. काशिनाथ गागरे यांचा प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, आत्या आसराबाई गोर्डे यांच्या निधनामुळे कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम नाइलाजाने स्थगित करण्यात आल्याची माहिती श्री. रंभाजी काशिनाथ गागरे यांनी दिली आहे.
सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि परिचितांनी या बदलाची कृपया नोंद घ्यावी व गैरसोय टाळावी. स्थगित करण्यात आलेल्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाची पुढील तारीख परिस्थितीनुसार लवकरच सर्वांना कळविण्यात येईल, असे आवाहन गागरे व गोर्डे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
close