shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श! साई संस्थान सोसायटीचे कर्मचारी संतोष जपे यांनी सापडलेली रक्कम केली जमा

शिर्डीत प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श! साई संस्थान सोसायटीचे कर्मचारी संतोष जपे यांनी सापडलेली रक्कम केली जमा

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, शिर्डीत साईबाबांच्या एका निस्सीम भक्ताने आणि साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या कर्मचाऱ्याने आपल्या कृतीतून 'प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे' याचा एक उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे. संतोष उत्तम जपे असे या प्रामाणिक कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी त्यांना सापडलेली रोख रक्कम त्वरित संरक्षण विभागात जमा करून साईंच्या शिकवणीचा खरा अर्थ समाजासमोर मांडला आहे.
नेमके काय घडले?
सविस्तर वृत्त असे की, ४ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी श्री. संतोष जपे हे 'पावर हाऊस गेट' परिसरातून जात होते. यावेळी त्यांना तिथे ५३० रुपयांची (पाचशे तीस रुपये) रोख रक्कम बेवारस स्थितीत पडलेली आढळली. पैशांचा कोणताही मोह न ठेवता, 'सबका मालिक एक' या साईंच्या वचनाचे स्मरण करत त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती रक्कम थेट साई संस्थानच्या संरक्षण कार्यालयात नेऊन दिली. तिथे ड्युटीवर कार्यरत असलेले संरक्षण विभागाचे कर्मचारी श्री. राजेंद्र वाघ यांच्याकडे त्यांनी ही रक्कम अधिकृतरीत्या जमा केली.
संस्थान आणि पदाधिकाऱ्यांकडून पाठीवर शाबासकीची थाप
संतोष जपे यांच्या या निस्पृह आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेत साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाकडून त्यांना तात्काळ अधिकृत 'आभारपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या प्रामाणिकपणाची शिर्डी परिसरात सर्वत्र चर्चा होत असून, पोलीस आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
तसेच, त्यांच्या या स्पृहणीय कार्याबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि सचिव विलासराव वाणी यांनी संतोष जपे यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रक्कम जरी छोटी असली, तरी संतोष जपे यांनी दाखवलेली सचोटी आणि प्रामाणिकपणा लाखमोलाचा आहे. त्यांच्या या कृतीने साईबाबांच्या दरबारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मान अभिमानाने आणखी उंचावली आहे, अशीच भावना आता शिर्डीकरांमधून व्यक्त होत आहे.
close