shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, स्वराज्य सेना आणि शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीचा मोठा उत्साह!



खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शिवरायांचे पूजन व महाआरती संपन्न; शिवभक्तांची मोठी मांदियाळी

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, स्वराज्य सेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या भव्य सोहळ्याप्रसंगी शहरातील व जिल्ह्यातील अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
या मंगल प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब, माजी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर आणि शिर्डी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले.
या सोहळ्यास सर्वपक्षीय नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ कोते, भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन भाऊ शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन भाऊ चौगुले, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक नंदू भाऊ गोंदकर, नगरसेवक गणेश सोनवणे, युवासेना माजी जिल्हाध्यक्ष दिनेश शिंदे, सोसायटी संचालक तानाजी अण्णा गोंदकर, साहेबराव काटकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर, भाजप प्रदेश सदस्य नानासाहेब शिंदे यांचा समावेश होता.
तसेच, प्रकाश आबा गोंदकर, विकी गोंदकर, शिवसेना उपशहरप्रमुख नितीन अशोकराव कोते, विश्वजीत बागुल, साकोरी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक बावके, अक्षय सुपेकर, सुंदर सुपेकर, कैलास शिंदे, आप्पा धुळसैदर, अरुण त्र्यंबकवाल यांच्यासह स्वराज्य सेनेचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
close