shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी भाषिक अस्मिता टिकवणे गरजेचे: प्रा दिलीप जाधव

सांगली प्रतिनिधी:
मातृभाषा केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती आपली संस्कृती, इतिहास आणि ओळख टिकवून ठेवते भाषेचा योग्य अर्थवाही वापर करून मराठी भाषिक अस्मिता टिकवणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन बळवंत महाविद्यालय विटाचे मराठी विषयाचे प्रा.दिलीप जाधव यांनी केले.
 अतिग्रे येतील संजय घोडावत युनिव्हर्सिटी  इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य होते.

पुढे बोलताना प्राध्यापक जाधव म्हणाले परंपरा आणि संस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचे कार्य भाषेच्या माध्यमातून मराठी यासाठी बोली भाषेचे योगदान फार महत्त्वाचे या बोलीभाषा टिकल्या नाहीत तर लोकसाहित्याचा खजिना नष्ट होण्याची भीती व्यक्त करून इंग्रजी भाषा ही जागतिक व्यवहाराची भाषा असली तरी मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. यावेळी कवी कुसुमाग्रजांच्या साहित्याची ओळख त्यांनी आपल्या व्याख्यानातून करून दिली. 
प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक जाधव यांनी करून दिपप्रज्वलन केले मराठी विषयाचे प्रा. संतोष पाटील यांनी  प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्राचार्य नवीन शहर यांच्या हस्ते प्रा. दिलीप जाधव यांना शाल , सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कुमारी अवंती जाधव हीन  मनोगत व्यक्त केले, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता व मराठी भाषेच्या विविध प्रवाहाची नाट्यछटा सादरीकरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य एच एम नवीन यांनी व्हाट्सअप आणि सोशल मीडियाच्या काळात भाषेचा समतोल साधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आराध्या व कुमारी विवा यांनी केले तर आभार साक्षी लोहार हीने मानले.

०००
close