तारापूर (प्रतिनिधी):येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात समाजासाठी झटणाऱ्या नऊ महिलांचा 'नवदुर्गा' म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्यशिक्षिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारापूर गावच्या सरपंच सौ.भारतीताई जगताप या होत्या.प्रशालेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या तसेच कठीण परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाच्या आधार बनलेल्या खालील महिलांना सन्मानित करण्यात आला. सौ. सीमा हनुमंत क्षीरसागर (मगरवाडी) सौ. शितल चंदु लांडे(मगरवाडी)श्रीमती अंजना महादेव शिंदे (तारापूरनाला)श्रीमती कल्पना विक्रम साठे (तारापूर नाला)श्रीमती प्रीती प्रशांत सातपुते (पाटकुल)श्रीमती सीमा विष्णू नाईकनवरे (फूलचिंचोली)सौ. साळुबाई विठोबा वाघमारे (तारापूर नाला)सौ. अनुसया नितीन देवकर (तारापूर नाला)श्रीमती वृषाली सूर्यकांत गायकवाड (पोहरगाव) या कर्तुत्वान महिलांचा सन्मान सरपंच सौ.भारतीताई जगताप यांच्या हस्ते फेटा,शाल,गुलाब पुष्प,भेटवस्तू देऊन करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधुन स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रांगोळी स्पर्धेत विविध विषयावर रांगोळी काढण्यात आल्या.महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.परीक्षकांच्या निर्णयानुसार विजेते खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक सौ.दिपाली सुमित कांबळे
द्वितीय क्रमांक सौ.गीतांजली सचिन सपाटे तर तृतीय क्रमांक सौ.ज्योती अमर गायकवाड यांनी मिळवला विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी प्रशालेत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले.विविध क्रीडा स्पर्धा, परीक्षा इत्यादी उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असे विचार व्यक्त केले. सरपंच भारतीताई जगताप यांनी प्रशालेच्या या उपक्रमाचे कौतुक करत सत्कारमूर्ती महिलांचे कौतुक करत त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडावे यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सत्कारमूर्ती नवदुर्गा सौ साळुबाई विठोबा वाघमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध क्षेत्रात महिलांनी केलेले काम व स्त्री शिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्रशालेतील यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव सहशिक्षिका सुजाता गायकवाड अस्मिता सोनटक्के व सहशिक्षक अनिकेत चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन सौ.संध्या कदम यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.
या सोहळ्यासाठी प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

