shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"वृद्धातत्वात ही घातली यशाला गवसणी" : भांड बाबांची सार्थ तुकाराम गाथेची अमर कहाणी..!!"

वयाचा बंध सोडून,शब्दांचा संग : भांड बाबांची स्वहस्ते लिखित सार्थ तुकाराम महाराज गाथा भंडारा डोंगर परिसरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात...

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार  ता. ०७/०३/२०२६

👉"वृद्धत्वातही घातली यशाला गवसणी" : भांड बाबांची सार्थ तुकाराम गाथेची अमर कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादाई ..!!"


आहिल्यानगर (नाशिक) : ८३ वर्षाचे भांड बाबा यांनी गेल्या साडे आठ महिन्यांपासून स्वतः च्या हाताने लिहून सार्थ तुकाराम गाथेचे लेखन पूर्ण केले. स्व हस्तलिखित गाथा त्यांनी संत तुकाराम महाराज बीजेच्या पावन पर्वाच्या शुभदिनी भंडारा डोंगर मावळ, जिल्हा पुणे येथील श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट चे सचिव जोपाशेठ पवार व ह.भ.प.संजय महाराज पाचकोर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

      नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेले चिमाजी धोंडीराम भांड म्हणजेच भांड बाबा हे ८३ वर्षाचे असून भांड बाबांचा जन्म २७ डिसेंबर १९४३ रोजी सायखेडा ता. निफाड, जि. नाशिक येथे झालेला आहे.
     त्यांचे शिक्षण वडांगळी, ता. सिन्नर, जि. नाशिक या शाळेत फक्त ३ री पर्यंत झालेले आहे. ते श्रमस्मृती 'एल.आय.सी. कॉलनी, राजीवनगर नाशिक-९. येथील रहिवासी आहेत. त्यांचा व्यवसाय वर्तमानपत्र वितरण हा असून ते आपल्या व्यवसायाला च देव मानून मनापासून आणि इमाने इतमाने ते आपला व्यवसाय आज ही या वयात मनापासून करतात वयाचा विचार करता कामाचा कुठलाही कंटाळा आज ही ते करत नाहीत नाशिक येथील सिडको भागामध्ये भल्या सकाळी च नियमित वर्तमानपत्र वितरण करण्याचं काम करतात.
चौकट 
       " भांड बाबा यांचे शिक्षण हे कमी असूनही यांनी गेल्या साडे आठ महिन्यांपासून सार्थ तुकाराम गाथेचे लेखन स्वतः पूर्ण केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा आदर्श अनेकांनी घेण्यासारखा आहे. आजच्या काळात प्रत्येक जण सुशिक्षित आहे , पैसे आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही अनेक उपलब्ध आहेत, पैसे भरपूर प्रमाणात आहेत,म्हणजे भौतिक सुख सुखाच्या भरपूर गोष्टी उपलब्ध आहे परंतु असे असतांना देखील कित्येक जण हे आपली आवड आणि निवड जोपासायला वेळ देत नाही. परंतु आपली आवड आणि निवड याचा सुरेख संगम विचारात घेऊन  या दोन गोष्टींची सांगड घालण्यात अनेकांना यश मिळत नाही. परंतु भांड बाबा हे सर्व आवडीने करतात म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे."

भांड बाबांच्या कार्याला सलाम.......!!

 "भांड बाबां ८३ वर्षांचे असूनही त्यांनी सार्थ तुकाराम गाथेचे लेखन पूर्ण केले हे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श आजच्या युवकांसाठी अनुकरणीय आणि अकल्पनीय असे आहे. "

  या कार्यक्रम प्रसंगी विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट चे सचिव जोपाशेठ पवार व ह.भ.प.संजय महाराज पाचकोर यांच्या हस्ते भांड बाबां चा सन्मान करण्यात आला.
     या सत्कार सोहळ्या प्रसंगी त्यांचे बंधू अरुण भांड, सिताराम भांड,जावई रमेश सातव (सर), मुले व मुली उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close