श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतमध्ये काल शुक्रवारी हि घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायतीचे विविध कामे आपल्या जेसीबीच्या साह्याने श्री.बबन चव्हाण यांनी केले असून त्या कामांचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे संबंधितांकडे पेमेंटची मागणी केली.
परंतु त्यांना त्यांचे बिल न मिळाल्याने शेवटी वैतागलेल्या जेसीबी मालक चव्हाण यांनी ग्रामपंचायतमध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.य घटनेनंतर प्रचंड धांदल गावात उडाली.दरम्यान चव्हाण यांना कामगार रुग्णालय श्रीरामपूर शहर येथे उपचारकामी दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

