shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा संपन्न.

वडापुरी येथे भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा संपन्न.
इंदापूर- वडापुरी  : 

आषाढी एकादशी ।
नामा होता उपवासी ॥१॥
देवें गरुड धाडिला ।
वेगीं बालाविलें त्याला ॥२॥
राही म्हणे पांडुरंगा ।
कोणें बोलाविलें सांगा ॥३॥
ऐसा भक्तराज निका ।
दासी जनीचा आत्मसखा ॥४॥
 विठ्ठल विठ्ठल...जय हरी विठ्ठल!
 नाम जैगोशामध्ये श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पुण्य पावन स्पर्शाने पावन झालेल्या व श्रीनाथांच्या पावन अशा 
वडापुरी (ता. इंदापूर) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी देवशयनी एकादशी निमित्त सकाळी शिवप्रसाद सुखदेव पवार व त्यांच्या सुविद्या  पत्नी  दीपिका पवार यांच्या हस्ते महाअभिषेक महापूजा व आरती संपन्न झाली. यावेळी पौरात्य राजूकाका कुलकर्णी यांनी केले.

 यावेळी प्रशांत शिर्के, बापू काटकर, काशिनाथ माने, वासुदेव माने, महेश शेलार, राजेंद्र माने, संतोष देशमुख, बबन माने, तात्याराम पवार, बाळासाहेब माने, अक्षय जगताप व  महिला भगिनी उपस्थित होत्या.
close