*नव्याने सुरू केलेल्या एस टी बसचे एन . ई .एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर यांच्या वतीने करण्यात आले स्वागत.
इंदापूर : इंदापूर आगाराने नव्याने सुरू केलेल्या बसचे स्वागत एन . ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर ता. इंदापूर चे प्राचार्य सी.जी. रणवरे सर व पर्यवेक्षक खरात सर यांनी केले बसचे चालक नामदेव फड वाहक पूनम ठोसर वाहक दीपक खुडे यांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांना या नव्याने सुरू झालेला बसचा फायदा होणार आहे इंदापूर आगारातून सकाळी ७ः३०वाजता सुटणारी गाडी वकील वस्ती - भोडणी-शहाजी नगर- रेडा- सराफवाडी घोरपडवाडी- निमसाखर कळंब वालचंदनगर या मार्गाने या मार्गावर एसटी बस सेवा सुरू राहणार आहे ही गाडी वालचंदनगर येथून दुपारी ३:४५ वाजता सुटून याच मार्गे इंदापूरला जाणार आहे तालुक्यातील या आड मार्गाने इंदापूर वालचंद नगर या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक गावातील विद्यार्थी व नागरिक यांना बस हेच प्रवासाचे साधन असल्यामुळे नव्याने सुरू झालेल्या बसमुळे प्रवासाची सोय झाल्याचे प्राचार्यांनी सांगितले रेडा, घोरपडवाडी, सराफवाडी या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यालयात येतात या मार्गावर एसटी बस सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज विद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु या मार्गावर बस सुविधा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची नियमित उपस्थित राहील असे सांगितले बसचे स्वागत करते वेळी विद्यालयातील शिक्षक बोंद्रे सर, .किसवे सर, हनमंते सर, भोसले सर, रणवरे सर, तोरणे सर,सौ नगरे मॅडम सौ शेंडे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

