शब्दांचे नव्हे, कार्याचे वादळ,
जनतेच्या हृदयात वसलेले दीप उजळ,
न्यायासाठी पेटलेले एक व्रतस्थ मन,
आ.अभिमन्यू पवार - समाजाचा खरा जीवनधन!
शेतकऱ्यांच्या ओठांवरील आशेचा किरण,
दुष्काळी भूमीत पावसाचा आनंदी सरण,
सत्तेच्या राजमार्गावर न वाकणारा, न मोडणारा,
पण सत्यासाठी झगडणारा, प्राणांपेक्षा लोकहित जपणारा!
वाऱ्यावरून दिशा बदलणाऱ्यांचा काळोख फोडणारा,
धर्मासाठी, संस्कृतीसाठी अखंड उभा राहणारा,
अन्यायाच्या छायेतही संयमाने शांत राहणारा,
आणि गरज पडल्यास रणभूमीवर वज्रासारखा उधळणारा!
आपलेपणा जपणारा, हृदयातून प्रेम देणारा,
दु:खींच्या अश्रूंना शब्दांच्या उबदार हातांनी पुसणारा,
सत्तेसाठी नाही तर स्थैर्यासाठी झगडणारा,
स्वतःवर अन्याय सहन करूनही न्यायाचा दीप वाहणारा!
सत्ता, लोभ, मोह यांच्या पलिकडचा प्रवासी,
अखंड कार्यशील, कार्याचा एक अवलिया सन्यासी,
राजकारणाच्या रणांगणात धर्मनीतीचा शिलेदार,
अभिमन्यू पवार - महाराष्ट्राचा तेजस्वी धाराधार!
तुम्हाला पाहून जनतेला जगण्याचा नवा विश्वास मिळतो,
तुमच्या कार्याने समाजाला नवा प्रकाश स्फुरतो,
तूम्ही आहात म्हणूनच आम्हाला जगण्याचा अभिमान वाटतो,
अभिमन्यूजी पवार साहेब तुमच्या नावाने महाराष्ट्र गर्जतो!
रमेश जेठे सर,अहिल्यानगर
०००००