shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - राकाँशप पक्षाने दिले निवेदन...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - राकाँशप पक्षाने दिले निवेदन...

धरणगाव -- धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर मागण्यांचा संदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. 

                  या निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1)महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफी केली जाईल व शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सत्तेत आल्यानंतर अजूनही शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली नाही. शेतकरी अनंत अडचणीत आहे, त्यामुळे फडणवीस सरकारने त्वरित कर्जमाफी करावी. 2) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही शासनाने जीआर काढून निम्मे केली आहे ती मदत पूर्ववत वाढवून मिळावी. 3) धरणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांची सर्व ज्वारी खरेदी झाली पाहिजे व त्याकरिता त्वरित गोदाम उपलब्ध करून द्यावे. 4) कृषी विभागातील मंजूर पदांपैकी फक्त 30 टक्के स्टाफ कार्यरत आहेत उर्वरित मंडलाधिकारी, सुपरवायझर, कृषी सहाय्यक यांच्या त्वरित नियुक्त्या करण्यात याव्यात व शेतकऱ्यांना न्याय मिळावा. 5) धरणगाव तालुक्यातील तरुण वर्ग व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता धरणगाव तालुक्यात शासनाने मोठा प्रकल्प आणावा व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. या सर्व मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अशी मागणी धरणगांव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या घोषणांनी तहसिल कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. निवेदनाचे वाचन पक्षाचे जेष्ठ नेते प्रा एन डी पाटील यांनी केले.

              राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातून व शहरातून बाळासाहेब पाटील, संजय पाटील, उज्वल पाटील, कल्पिता पाटील, डी एस पाटील, प्रा आर एन भदाणे, डॉ विलास चव्हाण, लक्ष्मणराव पाटील, वाल्मिक पाटील, डॉ नितीन पाटील, बापू मोरे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, गोपाल पाटील, अमोल हरपे, अमित शिंदे, भगवान शिंदे, ओंकार माळी, नारायण चौधरी, मोहीत पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र वाणी, श्रीकृष्ण पाटील, संभाजी पाटील, साईनाथ पाटील, देविदास सोनवणे, एकनाथ पाटील, हितेंद्र पाटील, परेश गुजर, एकनाथ पाटील, विकास पाटील, विनायक पाटील, चंद्रभान बाविस्कर, कोमलसिंग पाटील, धनराज पाटील, पिरचंद पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, महेश बोरसे, समाधान पाटील, सुभाष पाटील, सागर महाले, मो जुनेद, सिराज कुरेशी, शेख जहांगीर, नगर मोमीन, राहुल पाटील, दिनेश भदाणे आदी उपस्थित होते.

close