shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणीकरवर कार्यवाही करण्याची राकाँशप पक्षाच्या वतीने मागणी...


धरणगाव प्रतिनिधी --

धरणगाव -- धरणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाचाळवीर बबनराव लोणीकर यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. 

                नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी त्यांचे कुटुंबीय, युवक आणि महिला यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा कृषी क्षेत्र असून शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आया - बहिणींचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. असे असतांना लोणीकर युवकांना उद्देशून बोलले की, तुझ्या बापाला बियाणे घ्यायला पैसे आम्ही दिले, तुझ्या आई - बहिणीच्या खात्यात आम्ही पैसे टाकतो, तुझ्या पायातील चप्पल आम्ही दिली आहेत;अशा प्रकारचे वक्तव्य केले. शेतकरी तसेच महिलांना शासनामार्फत जे काही अनुदान दिले जाते त्यावरून लोणीकरांनी जे भाष्य केले ते अत्यंत चुकीचे आहे. सरकार जनतेचे असते, लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असतात, कोणतीही योजना जनेतेच्या पैशांवर चालते असे असतांना आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय म्हणजे उपकार करतोय हा अविर्भाव चुकीचा आहे. लोकप्रतिनिधीच्या नात्याने लोणीकर यांनी शेतकरी, महिला, युवक व इतर घटकांना अपमानित करणारे जे भाष्य केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. लोणीकरांवर भादंवि अंतर्गत कार्यवाही करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव तालुका व शहराच्या वतीने करण्यात आले. निवेदनाचे वाचन पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

              राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते तहसिलदार पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातून व शहरातून बाळासाहेब पाटील, संजय पाटील, उज्वल पाटील, कल्पिता पाटील, डी एस पाटील, प्रा आर एन भदाणे, डॉ विलास चव्हाण, लक्ष्मणराव पाटील, वाल्मिक पाटील, डॉ नितीन पाटील, बापू मोरे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, गोपाल पाटील, अमोल हरपे, अमित शिंदे, भगवान शिंदे, ओंकार माळी, नारायण चौधरी, मोहीत पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र वाणी, श्रीकृष्ण पाटील, संभाजी पाटील, साईनाथ पाटील, देविदास सोनवणे, एकनाथ पाटील, हितेंद्र पाटील, परेश गुजर, एकनाथ पाटील, विकास पाटील, विनायक पाटील, चंद्रभान बाविस्कर, कोमलसिंग पाटील, धनराज पाटील, पिरचंद पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, महेश बोरसे, समाधान पाटील, सुभाष पाटील, सागर महाले, मो जुनेद, सिराज कुरेशी, शेख जहांगीर, नगर मोमीन, राहुल पाटील, दिनेश भदाणे आदी उपस्थित होते.

close