वडाळा महादेव [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील विठ्ठल नगर गायधने वस्ती येथील तरुण भाविक सालाबादप्रमाणे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सायकल दिंडी वारी करत आहेत या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश तसेच बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश देत सायकल दिंडी वारीचे आयोजन केले आहे,.
प्रसंगी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ गायधने तसेच सौ संगीता गायधने यांचे शुभ हस्ते विधिवत पूजन करून दिंडीतील भाविकांचा शुभेच्छा व्यक्त करून सन्मान केला
यावेळी केतन गायधने सुदर्शन गायधने विजय गायधने वैभव गायधने प्रसाद गायधने मेजर नवनाथ तांबे श्रीराम गायधने डॉ पवन भांड किरण कांबळे तसेच किसन गायधने फक्कड गायधने बाळासाहेब गायधने दशरथ गायधने पोपट गायधने दिगंबर गायधने रवींद्र गायधने सुनील भोसले शरद तांबे शशिकांत कांबळे नंदकिशोर गायधने सुनील गायधने सहदेव गायधने वसंत गायधने आदींनी यामध्ये सहभाग घेऊन वृक्षारोपणाचा संकल्प केला सामाजिक कार्यकर्ते किरण गायधने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले,

