shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंजनी प्रकल्पाला गती; मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्णयाने पूर्णत्वाच्या दिशेने पाऊल.

अंजनी प्रकल्पाला गती; मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्णयाने पूर्णत्वाच्या दिशेने पाऊल.

एरंडोल/जळगाव
: दीर्घकाळापासून अर्धवट अवस्थेत असलेला अंजनी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळाली आहे.

मंत्रालयातील महत्त्वाची बैठक...

दिनांक ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात तापी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव डी.एल. कपूर, सचिव बेलसरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक बोरकर, अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन तसेच एरंडोल आणि जळगावचे आमदार महेंद्रसिंह बापू पाटील उपस्थित होते.

महेंद्रसिंह बापूंची ठाम मागणी...

अंजनी धरणाच्या वाढीव (दुसरा टप्पा) प्रकल्पासाठी पाण्याची कमतरता ही मोठी अडचण होती. नार–पार तापी प्रकल्पात गिरणा धरणासाठी मंजूर झालेल्या 10.6 टीएमसी पाण्यातून 1 टीएमसी पाणी अंजनी प्रकल्पासाठी देण्याची आग्रही मागणी महेंद्रबापूंनी केली. यावर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली आणि तातडीने नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करण्याचे आदेश दिले.

आधीच झालेले काम आणि खर्च...

या प्रकल्पावर आतापर्यंत ३२ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, वाढीव क्षमतेची भिंत आधीच पूर्ण झाली आहे. युती सरकारच्या काळात महेंद्रबापूंच्या प्रयत्नातून प्रकल्पाला गती मिळाली होती. परंतु नंतरच्या काळात दुर्लक्ष झाल्याने काम ठप्प झाले होते. आता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्प पुन्हा रुळावर आला आहे.

शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभ.

अंजनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एरंडोल व धरणगाव तालुक्यातील शेकडो एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.(सूत्र)


close