श्रीनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी तपासे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न.
इंदापूर : श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे (दि.7 ऑगस्ट) रोजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शहाजी तपासे यांचा सेवापूर्ती समारंभ विद्यालयाच्या वतीने संपन्न झाला .
याप्रसंगी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जनार्दन देवकर सर, अशोक फडतरे,संस्थेचे सचिव राजेंद्र पाटीलसर निवृत्ती शिर्के,राजेंद्र नलवडे,नवनाथ बागल उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शकुंतला पवार आणि इतर सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने तपासे सर यांचा यथोचित सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपस्थित सर्व संचालक यांचे हस्ते सन्मान करणेत आला.
या प्रसंगी सरांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी सरांच्या पत्नी सौ.मनिषा तपासे आणि मुलगा चि.निखिल तपासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक नियुक्त होण्यापूर्वी पांडुरंग पवार सर आणि मुरलीधर चौरे सर यांनी विद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करून सहकार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे हस्ते त्यांना सन्मानित करणेत आले.
तसेच वडापुरी गावचे सुपुत्र आणि श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दत्तात्रय शिर्के यांचे चिरंजीव आणि कर्मयोगी कारखान्याचे नवनियुक्त कार्यकारी संचालक विजयसिंह शिर्के यांनाही विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करणेत आले.
पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त शिक्षण सेवक .विठ्ठल चव्हाण सर,.संजय काकडे सर यांचे हि संस्थेच्या वतीने स्वागत करणेत आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ.अर्चना शिर्के मॅडम यांनी केले, तर विद्यालयाचे इतर सहशिक्षक हणमंत खताळ सर,संदीप शिंगाडे सर, सौ.सीमा थोरात , साक्षी कासार ,श्री.विठ्ठल चव्हाण सर,संजय काकडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रल्हाद शिर्के सर, समीर मदने यांनी मोलाचे सहकार्य केले.शेवटी तपासे सर यांचे वतीने विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
-----------------
फोटो ओळ : श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे मुख्याध्यापक शहाजी तपासी यांचा सेवापूर्ती सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.