एरंडोल – एरंडोल तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व युवा पत्रकार श्री. राजधर महाजन यांच्या ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे तर्फे माहिती अधिकार, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत ही गौरवशाली निवड करण्यात आली असून या यशाबद्दल त्यांचे Shirdi express live news तर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदअण्णा पाटील, तसेच एरंडोल तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी. एस. चौधरी यांनी श्री. राजधर महाजन यांचे अभिनंदन केले.
एरंडोल तालुका पत्रकार संघातील सर्व मान्यवर पदाधिकारी व पत्रकार बांधवांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.