नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांतील हा तिसरा अपघात, अपघातांची मालिका कधी बंद होणार ?...!!
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार ता.०३/०९/२०२५
राहुरी : नगर मनमाड महामार्गावर लागोपाठ आठ दिवसांमध्ये चार भीषण अपघात झाले या अपघातांमध्ये चार जणांना जीव गमवावा लागला आहे. आज ता.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता राहुरी खुर्द येथे मोटार सायकलला कंटेनर ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय 68) हे जागीच ठार झाले तर राहुरीच्या कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके सुदैवाने बचावले.
सायंकाळी फिरायला गेलेले हे दोघेजण मोटरसायकल वरून घरी परतत होते .नगर मनमाड रस्ता दुचाकी वर क्रॉस करताना कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने साबळे व प्रा.डोके दोघेही रस्त्यावर पडले. मात्र दोघे दोन विरुद्ध दिशांना रस्त्यावर पडले . साबळे यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नगर मनमाड महामार्गावर गेल्या दोन दिवसात तीन अपघात झाले असून तीन बळी पडले आहेत .नगर मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक आणि प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झालेला आहे. सामाजिक माध्यमे याविरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहेत .मात्र यंत्रणा कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. कालच ज्ञानदेव बलमे या एमआयडीसी त जाताना युवकाचा अपघातात मृत्यू झाला तर गुहा येथे झालेल्या अपघातात अकोले येथील एकाचा मृत्यू झाला. तर आज सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला.प्रा. डोके जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
"नगर मनमाड रस्त्यावर अगणित खड्डे, अवजड वाहनांचे मोठ्या प्रमाणात होणारी वेगवान वाहतूक, संबंधित विभागाचा निष्क्रिय कारभार , हव्या त्या ठिकाणी सिग्नल नसणे आदी हे प्रमुख करणे या अपघातांना निमंत्रण देतात अशा अपघातामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो आणि या अपघातातून अनेकांचे संसार उघड्यावर पडतात तर कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका कधी बंद होणार ? संबंधित अधिकाऱ्यांना अजून किती जणांचा बळी घ्यायचा आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे."
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600