शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
धार्मिक बातमी
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या श्री गणेशाचे सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने शिर्डी नगरपालिकेच्या कृत्रिम बनवण्यात आलेल्या पाण्याच्या गणेश कुंडामध्ये विधिवत पूजा आरती करून विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली होती.
दररोज विधिवत कार्यक्रम, आरती पूजा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. सातव्या दिवशी या सोसायटीच्या श्रींचे विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती , छोटे बापू ,चांगदेव जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते पूजा,श्रींची आरती करण्यात आली. विधिवत पूजा व आरती नंतर श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या सवाद्य मिरवणुकीत सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार तसेच व्हा चेअरमन पोपटराव कोते, सचिव तसेच सर्व संचालक, सभासद ,कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. अनेकांनी या विसर्जन मिरवणुकीत बँड च्या तालावर नाचत व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, असा जयजयकार करत नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान ठीक ठिकाणी तसेच श्रीरामनगर मध्ये या श्रींचे पूजन करण्यात आले तसेच मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. विसर्जन मिरवणुकी नंतर शिर्डी नगरपालिकेच्या बनवण्यात आलेल्या पाण्याच्या कृतीम गणेश कुंडामध्ये विधिवत पूजा आरती करून या सोसायटीच्या गणेशाचे मोठ्या भक्ती भावात विसर्जन करण्यात आले.