शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
नाशिक – शहरातील जनार्दन नगर, नांदूर नाका परिसरात २२ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे. सत्ताधारी पक्षाचे मा. नगरसेवक व या घटनेचे मुख्य सुत्रधार उध्दव बाबुराव निमसे यांच्या आदेशावरून त्यांच्या साथीदारांनी धिंगाणा घालत वडार समाजातील २५ वर्षीय तरुण राहुल संजय धोत्रे आणि त्याचा मित्र अजय कुसळकर यांच्यावर निृण पध्दतीने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात नगरसेवकाच्या टोळीतील सुमित हांडोरे या गुंडाने चॉपरने वार करत राहुलचा कोथळा बाहेर काढला.तसेच लोखंडी रॉड, लाकडी दांडके, आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर व मित्रावर प्राण्याला हल्ले केले.या नराधम कृतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी राहुलला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता राहुलचा मृत्यू झाला. या अमानुष हत्येमुळे वडार समाजात प्रचंड संताप उसळला आहे.
*सत्ताधाऱ्यांची दादागिरी:
सदर घटनेनंतर आरोपी नगरसेवक उध्दव निमसे यांनी पोलिसांना खुलेआम धमकी दिली.
“आम्ही इथले डाॅन असताना आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. धोत्रे आडनावाचे सर्वच संपवले तरी आमचं काही होणार नाही. पैशाने सगळ्यांनाच विकत घेऊ,”
असा धक्कादायक इशारा त्यांनी पोलिसांना दिला असल्याचं समजतं.
📹 CCTV फुटेजही उपलब्ध; तरीही अटक नाही
या घटनेचं संपूर्ण CCTV फुटेज मध्ये निमसे हे हल्लेखोरांचे मुख्य सुत्रधाराचे काम करत असताना दिसत असताना व सर्व माहिती उपलब्ध असूनही आरोपी नगरसेवक आणि त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. यामुळे पीडित कुटुंबीय संतापून न्यायालयीन कारवाईची मागणी करत आहेत.
⚠️ कुटुंब भीतीत; आंदोलनाची चेतावणी
राहुलच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील महिला, वृद्ध आणि लहान मुलं भीतीने थरथरत असून, अनेक सदस्य अन्न-पाण्याला मुकले आहेत.
वडार समाजाने पोलिस प्रशासनाला ५ दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे.
📝 मागण्या:
- मा. नगरसेवक उध्दव बाबुराव निमसे हे मुख्य सुत्रधार असल्यांने त्यांना तातडीने अटक करावी.
- पीडित कुटुंबास पोलिस सुरक्षा द्यावी.
- संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
- आरोपी माजी नगरसेवकाला भविष्यात लोकप्रतिनिधीत्व देण्यात येवून नये.
या घटनेमुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. समाजाला न्याय मिळेल का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे.
००००००