एरंडोल – तालुक्यातील खडके बु येथे आज विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार मा.अमोल पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला. ही सर्व कामे मा. आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाल्याने गावाच्या विकासाला नवे परिमाण मिळाले आहे.
कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोजभाऊ पाटील, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, सभापती दादाजी पाटील, तालुका संघटक संभाआबा पाटील, धरणगाव बाजार समिती संचालक देविदास चौधरी सर, तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, तसेच रवंजे येथील नाना कोळी, संदीप पाटील, खेडगाव सरपंच निंबा राठोड यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना-युवासेना पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अमोल पाटील म्हणाले,
"आज खडके येथे १.०७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. आपण केलेल्या मागण्यांसह काही न मागितलेली कामे देखील मंजूर केली आहेत. गावाचा सर्वांगीण विकास व लोकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. उर्वरित कामांना देखील प्राधान्याने पूर्ण करू," असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांनी पुढे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “आपण दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादामुळे आज विकासाचा प्रवाह गावोगावी पोहोचत आहे”, असे सांगितले.
✨ खडके बु येथे भूमिपूजन व लोकार्पण झालेली प्रमुख कामे :
1️⃣ एलईडी पथदिवे – १०.०० लाख
2️⃣ मरीमाता मंदिर परिसरात सभामंडप – ५.०० लाख
3️⃣ मुख्य रस्ता व गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण – २२.०० लाख
4️⃣ बौद्ध विहार बांधकाम (अनुसुचित व नवबौद्ध वस्तीत) – १०.०० लाख
5️⃣ श्री हनुमान मंदिर परिसरात सभामंडप – १५.०० लाख
6️⃣ देशमुख गल्ली भागात पेव्हर ब्लॉक बसविणे – १०.०० लाख
7️⃣ आर.ओ. प्रणाली बसविणे – ५.०० लाख
8️⃣ नवीन स्मशानभूमी बांधकाम – १०.०० लाख
9️⃣ ग्रामपंचायत इमारत बांधकाम – २०.०० लाख