शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार ता.०२/०८/२०२५
कलाशिक्षिकेचा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला असाही पाठिंबा..!!
अहिल्यानगर (राहुरी) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील आणि राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील माहेरवाशीण असलेल्या एका कला शिक्षिका असलेल्या सौ.अश्विनी राजेंद्र जाधव यांच्या घरी गौरी गणपती च्या उत्साहाप्रसंगी मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन मुंबई येथे सुरू आहे त्यांना पाठिंबा म्हणून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे व्यक्ती चित्र रेखाटून आरक्षणाला असाही पाठिंबा दिला.
त्यांनी अनोख्या पद्धतीने दिलेल्या समर्थनामुळे त्यांच्यावर मराठा समाजासह सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600