शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
आज दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे श्री गणेश उत्सवानिमित्त श्री गणेशाची आरती अगत्य वॉटर पार्क सावळी विहीर मालक श्री चेतनदादा कुलकर्णी तसेच साईभक्त रेणुकाजी पाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आली. आरती झाल्यानंतर केळी प्रसाद पेढा मोदक वाटण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचा साईबाबा शाल देऊन आभार मानण्यात आले.
हा सर्व कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.