shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हे साईनाथा! मनोज दादाच्या उत्तम आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी लाक्षणिक उपोषण

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

सामाजिक बातमी

मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे प्रखर नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहिले जात नसल्याने मराठा समाजात तीव्र संताप आहे.


सरकारकडून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाशी अन्याय केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. “इंग्रजांच्या काळातसुद्धा अशी वाईट वागणूक मिळाली नव्हती, पण आजच्या सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा अपमान केला आहे,” असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, मुंबईत गेलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते सुखरूप घरी पोहोचावेत, आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, सरकारला सद्बुद्धी यावी, यासाठी आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणात कानिफ गुंजाळ सहभागी झाले होते. या वेळी संजय आप्पा शिंदे, मनोज जाधव, सुयोग सावकारे, कैलास सुपेकर, रवी इंगळे, उमेश गायकवाड, रामनाथ सदाफळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिर्डी साई मंदिर परिसरात झालेल्या या प्रार्थना व उपोषणाला पोलीस निरीक्षक श्री. गलांडे, शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, विजय जगताप, सिमोन जगताप, विठ्ठल पवार, रामा गागरे, गोरख वदक, गणेश सहाणे, विशाल वाघ, संतोष पवार, गणेश मोरे, आकाश गवळी यांसारख्या मान्यवरांनी भेट देऊन मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात संपूर्ण समाज एकदिलाने उभा असून सरकारने लवकर निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी सर्वांची मागणी आहे.

📞 संपर्क: सचिन चौगुले पा. – 9850199359


close