धरणगाव प्रतिनिधी --धरणगाव येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
धरणगावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असलेले पोलीस निरीक्षक सुनिल पवार एक हाडाचे शिक्षक असून वैचारिक दृष्टीने अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व आहेत. पोलीस प्रशासनाचा तर गाढा अभ्यास आहेच परंतु इतर क्षेत्रात जसे कला, संस्कृती, शिक्षण, रोजगार याबाबत देखील त्यांचा गाढा अभ्यास आहे. आपल्या सर्व महापुरुषांनी एकटं संघर्ष करण्याची जी प्रेरणा दिली त्यातून आपण शिकलं पाहिजे अशी भावना श्री पवार यांनी व्यक्त केली. जेथे कळवळ्याची जाती, तेथे लाभाविण प्रीती अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेल्या पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या निष्ठावंत शिलेदारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी धरणगाव तालूकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, जेष्ठ नेते ओंकार माळी, जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र धनगर, उद्योजक एकनाथ पाटील, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, प्रगतीशील शेतकरी भरत धनगर, नंदू धनगर, भगवान शिंदे, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, व्यावसायिक खलील खान, रफिक खान, साजिद कुरेशी, सागर महाले, रमेश महाजन, व्यापारी जुनेद बागवान, दिपक मराठे, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आदी उपस्थित होते.