अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
राहुरी तालुक्यातील राहुरी बाजार येथे खरेदीसाठी गेलेल्या शिर्डी एक्स्प्रेसचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार रमेश जेठे यांचा मोबाईल 16 फेब्रुवारी 2023 रोजी फायर ब्रिगेड कार्यालयासमोर खरेदीदरम्यान चोरीला गेला होता. या घटनेबाबत त्यांनी त्याच दिवशी सुमारे दुपारी साडेचार वाजता राहुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस कॉन्स्टेबल श्री. खंडागळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
सदर पोलिस कर्मचारी खंडागळे हे रमेश जेठे सर यांच्या घरासमोर साध्या ड्रेस वर येऊन धमकी देऊन जात असताना (खंडागळे यांनी रमेश जेठे सर यांच्या घरी धमकी देण्यासाठी सदर गाडी आणली होती.)पत्रकार रमेश जेठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खंडागळे यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनी वारंवार आजारी असल्याचे सांगत तपासात कोणतीही प्रगती केली नाही. पत्रकारांनी त्यांची तब्येत लक्षात घेऊन त्यांना त्रास न देता सहकार्याची भूमिका घेतली. तपासात प्रगती नसतानाही खंडागळे यांच्याकडून “मोबाईल मिळवून देऊ” असे सांगण्यात येत राहिले.
📅 ३० ऑगस्ट २०२५ रोजी घडलेली धक्कादायक घटना:
पत्रकारांनी तपासाची माहिती विचारण्यासाठी खंडागळे यांना व्हॉट्सअॅपवरून संदेश पाठवला. त्यावर त्यांनी दुपारी साडेपाच वाजता पत्रकारांना कॉल करून “मी देहरेत आहे, लोकेशन टाक. मी क्रशरवर आहे, तु ये” असे सांगत धमकावण्याच्या सुरात बोलले. त्यानंतर वारंवार व्हॉट्सअॅप कॉल करून खंडागळे यांनी अश्लील शिवीगाळ केली.
पत्रकारांनी नंतर साध्या कॉलवर संपर्क साधला असता खंडागळे यांचे बोलणे अगदी सौम्य झाले. मात्र, काही वेळातच संध्याकाळी साडेसहा वाजता दारूच्या नशेत खंडागळे दोन अज्ञात व्यक्तींना घेऊन थेट पत्रकारांच्या घरी पोहोचले. घरासमोर आरडाओरडा करत धमकावण्यात आले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग सुरू केल्यावर खंडागळे आणि त्यांच्यासोबतचे लोक पळून गेले.
📢 पत्रकाराचा संताप आणि पत्रकार संघटनेची मागणी:
“एकीकडे मोबाईल चोरीच्या तक्रारीचा तपास झाला नाही, उलट तक्रारदार असलेल्या पत्रकारालाच धमक्या दिल्या जात आहेत. मी पत्रकार असून माझ्याबाबत असे होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था किती बिकट असेल, याची कल्पना येते,” असे पत्रकार रमेश जेठे यांनी सांगितले.
स्थानिक पत्रकार संघटनांनी या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
⚖️ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह:
पत्रकारांना अशा पद्धतीने धमकावून तपास टाळण्याचे प्रकार वाढले, तर पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. समाजासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
📌 घटनाक्रमाचा सारांश:
फिर्यादीची राहुरी पोलिस स्टेशन तक्रार
- १६ फेब्रुवारी २०२३ – राहुरी बाजारातून मोबाईल चोरी; राहुरी पोलिस स्टेशनला तक्रार.
- तपास – कॉन्स्टेबल खंडागळे यांच्याकडे सोपवला; तपासात प्रगती नाही.
- ३० ऑगस्ट २०२५ – पत्रकाराला वारंवार कॉल, धमक्या आणि शिवीगाळ.
- संध्याकाळी – दारूच्या नशेत दोन अज्ञातांसह पत्रकाराच्या घरी पोहोचून गोंधळ; व्हिडिओ शूटिंग सुरू होताच सदर पोलिस कर्मचारी व अज्ञात व्यक्ती पळून गेले.
- मागणी – उच्चस्तरीय चौकशी व कठोर कारवाईची.
०००००