*गौराईमळा जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही शिक्षकांच्या कामगिरीचे कौतुक*
*शाळेच्या पटसंख्येत दुप्पटीने वाढ : उपशिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी*
इंदापूर: जेमतेम २० पटसंख्या असलेल्या गौराईमळा (शेळगाव ता. इंदापुर ) जिल्हा परिषद शाळेचा पट सहा वर्षात दुप्पट करून दाखवीत सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत त्यांना भरीव यश मिळवून देणाऱ्या मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर व उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांचा जिल्हा उपशिक्षणाधिकारी सुनिल गच्छे साहेब यांनी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तपासणी अंतर्गत शाळेतील मुलांचे व दोन्ही शिक्षकांचे मनापासुन कौतुक केले . तसेच त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचे भरभरून कौतुकही केले. यावेळी शेळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब उपस्थित होते.
प्रताप शिरसट गुरुजी २०१८ मध्ये, जुबेदा पठाण मॅडम या २०१९ मध्ये गौराईमळा (शेळगाव , ता.इंदापुर ) येथील इयता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत अनुक्रमे मुख्याध्यापक व उपशिक्षक म्हणून हजर झाल्या. हे दोन्ही शिक्षक कार्यरत झाल्यापासुन शाळेचा विद्यार्थी पट जेमतेम २० होता, मात्र या दोन्ही शिक्षकांच्या जोडीने शाळेची ही स्थिती बदलविण्याचे ठरविले आणि गौराईमळा वस्तीतील सर्व ग्रामस्थांनीही त्यांना यासाठी उत्तम असा प्रतिसाद दिला. त्यानंतर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत नियमित वेळेपेक्षा अर्धातास आधी येण्यास सुरुवात केली, त्या वेळेत बुद्धी विकासाचे विविध उपक्रम, स्पेलिंग पाठांतर ,पाढे पाठांतर भाषण स्पर्धा, निबंध, वाद-विवाद, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धामध्ये वेळोवेळी सहभाग घेतला. त्यानंतर विद्याथ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्यात होणाऱ्या विकासामुळे शालेय विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत वाढत आज ती ४० पर्यंत पोहोचलो आहे. तसेच शाळेत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे.
या दोन्ही शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे , ग्रामस्थांच्या सहकार्याने इंदापुर पंचायत समितीचे मा. गटशिक्षणाधिकारी सन्मान अजिंक्य खरात साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे सन २०२४ : २०२५ मध्ये इंदापूर तालुक्यात *मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात व्दितीय क्रमांक मिळाला त्यामुळे शाळेची प्रगती व पटाची वाढ निश्चितपणे वाखाण्या सारखी आहे . असे केंद्र प्रमुख संभाजी आजबे साहेब म्हणाले या दोन्ही शिक्षकांचे काम खरेच कौतुकास्पद आहे , तेवढाच सिंहाचा वाटा या ग्रामस्थांचा आहे
गौराईमळा (ता. इंदापुर ) जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक प्रताप शिरसट व उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांना स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले .
बदलीचे निकष कामगिरीवर निर्धारित करावेत .सध्या शासनाकडून कार्यकाल, सेवा ज्येष्ठता किंवा इतर निकषांच्या आधारे जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या बदल्या करण्याचे धोरण आहे. त्यात प्रचंड राजकारण, संघटनांच्या तक्रारी आणि वादाचे विषय होतात. याऐवजी शासनाने यापुढे प्रत्येक शिक्षकाचे काम, त्याची गुणवत्ता, विद्यार्थी पट, शिष्यवृत्ती, प्रत्यक्ष पालकांच्या शिफारशी यावर त्यांची बदली निश्चित करावी, अशी मागणी काही पालक व्यक्त करत आहेत.
पुणे जिल्हा परिषद पुणे 2025 साठी 19 ऑगस्ट 2025 रोजी गौराईमळा शाळेची अध्यक्ष चषक पुणे जिल्हा , जिल्हा स्तरीय शाळा तपासणी पुर्ण केली .त्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सन्मान सुनिल गच्छे साहेब, पुणे जिल्हा परिषद विस्तार अधिकारी सन्मान हिंगणे साहेब , पुणे जिल्हा परिषद विस्तार अधिकारी शब्बीर शेख साहेब , बारामती, इंदापुर तालुका गटशिक्षणाधिकारी सन्मान निलेश गवळी साहेब व शेळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्मान संभाजी आजबे साहेब या टीमने शाळा व विद्यार्थी यांची सखोल तपासणी करुन कौतुक केले .
निश्चितपणे या शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायत शेळगावच्या सरपंच सौ. उर्मिलाताई शिंगाडे , मा. सरपंच रामदास शिंगाडे , शाळा स्थापना सदस्य लक्ष्मणराव शिंगाडे , ग्राम विकास अधिकारी जगताप भाऊसाहेब , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नाझरकर , अमोल जाधव , तात्यासाहेब शिंगाडे , उपसरपंच रेश्मा जाधव , अरुण जाधव सर अंबादास शिंगाडे , दिपक शिंगाडे , API संतोष जाधव साहेब , मा. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शामराव जाधव , शहाजी शिंगाडे , विलास शिंगाडे तसेच शेवंताताई भोसले यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले त्यामुळे नक्कीच शाळेची प्रगती ही गौराईमळा (शेळगाव) ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद आहे