पारोळा प्रतिनिधी:- पारोळा शहरासह आडगाव परिसरात जोरदार पाऊस आज दुपारी दोन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला व नदी नाल्यांना पूरसुदृश्य असे झाले.
यावर्षी सुरुवातीला पावसाने मात्र सुरुवात चांगल्या पावसाची झाली होती मध्यंतरी पावसाने खंड दिला होता त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत झालेला होता पण मागील दहा-बारा दिवसापूर्वीचे पाऊस पिकांना जीवदान मिळाले व शेतीला लागेल तेवढा पाऊस झाला पण शेतातून पाणी बाहेर निघालेले नव्हते. पोळ्याच्या सणाला सुद्धा बैल धुवायला नदीमध्ये पाणी देखील नव्हते पण आजच्या या दुपारी दोन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला या पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गात खूप आनंदाचे वातावरण दिसून येत आहे .काहीशा भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र आहे. आडगाव सह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावत शेतकरी वर्ग आनंदी झाल्याचे समजते.