नवी भाजपा पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर....!*
प्रविण माने यांच्यावतीने मान्यवरांचा सन्मान*
इंदापूर : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये इंदापूरचे आकाश कांबळे यांना भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पद तर गजानन वाकसे यांना ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवाजीराव निंबाळकर हे जिल्हाउपाध्यक्ष, नानासाहेब शेंडे यांना जिल्हा चिटणीस पद, तसेच प्रवीणकुमार शहा यांना पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रविण माने यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची व भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नव्याने करण्यात आलेल्या या निवडीमुळे भविष्यात पक्षाची ताकद आणखी वाढणार असून, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाशी जोडला जाणार असल्याची भावना यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केली.