shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तीर्थक्षेत्र सुकेश्वर येथे ऋषी पंचमी यात्रोत्सव उत्साहात संपन्न.

तीर्थक्षेत्र सुकेश्वर येथे ऋषी पंचमी यात्रोत्सव उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र सुकेश्वर येथे ऋषी पंचमी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

           यावेळी महाव्रत निमित्ताने महिलांची अलोट गर्दी लोटली होती.त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

      तीर्थक्षेत्र सुकेश्वर येथे ऋषी पंचमी महाव्रत निमित्ताने महाराष्ट्रातून विविध महिला मंडळी गिरणाई व श्री शुकदेव ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.सकाळ पासूनच महिलांची प्रचंड गर्दी झाली होती व वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.श्री शुकदेव मंदिरात दर्शनासाठी महिला भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.पुजारी महाराज यांनी विधीवत पूजा केल्या. 

          सुकेश्वर देवस्थान हे गिरणाइच्या कुशीत वसलेलं प्राचीन मंदिर असून १६ व्या शतकातील हेमाडपंथी मंदिरात श्री शुकदेव ऋषी यांची मूर्ती स्थापन केली आहे.गिरणाई स्नान व ऋषी दर्शन या व्रताचे वैशिष्ट्य असते.असे श्री हरी पाठक महाराज यांनी सांगितले.त्यामुळेच हजारो महिला भाविक भक्त येतात.याप्रसंगी विष्णू कोळी, राजू माळी यांनी दर्शन बारी व्यवस्थापन केले. तर देवस्थान चे अध्यक्ष विजय भामरे, उपाध्यक्ष गोपाळ कोळी, खजिनदार शिवाजी कोळी, विश्वस्त महारू पाटील,पुजारी त्र्यंबक चौधरी यांनी यात्रा यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेत.

close