shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला सलग चौथ्यांदा “अति उत्तम” मानांकन.

राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईकडून गौरव – शैक्षणिक इतिहासात अभिमानाची नोंद.
शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला सलग चौथ्यांदा “अति उत्तम” मानांकन.

एरंडोल : एरंडोल तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाची भर घालत शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत “अति उत्तम” हा प्रतिष्ठेचा दर्जा पटकावला आहे.

मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, विद्यार्थी कल्याण योजना, आधुनिक ग्रंथालय सुविधा तसेच संस्थेचे सामाजिक कार्य अशा विविध अंगांचा सखोल आढावा घेण्यात आला. सर्वच बाबींमध्ये प्रभावी कामगिरी करत महाविद्यालयाने राज्यातील अग्रगण्य संस्थांच्या यादीत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणा सोबतच संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न या यशामागे आहे.”

संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करत पुढील काळात संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी म्हटले की, “या कामगिरीमुळे एरंडोल तालुक्याचे शैक्षणिक स्थान राज्यात अधिक बळकट झाले असून परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.”

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे हे सलग चौथ्यांदा मिळालेले मानांकन केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण एरंडोल तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.


close