नगर प्रतिनिधी:
शिर्डी विर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहराची गणरायाची आरती साईश्रद्धा प्रतिष्ठान शिर्डी शहर संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
त्यानंतर पत्रकार संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष :-श्री. विजय पवार उपअध्यक्ष :-राजेंद्र बर्डे उत्सव कमिटी अध्यक्ष :-दिपक बर्डे, मा. किरणभाऊ बर्डे,राहुल गायकवाड, तुषार, शेजवळ, संजय पवार, सुनिल बर्डे, अनिल बर्डे, निलेश बर्डे,सोमेश्वर बर्डे, सतिष शिरसाठ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने दरवर्षी विर एकलव्य चौक (भाजी मार्केट) येथे गणेशोत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला. गणेशोत्सव निमित्त शिर्डी शहरातील विविध माध्यमातील सामाजिक राजकीय मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. विर एकलव्य प्रतिष्ठाण सामाजिक क्षेत्रात शिर्डी व नगर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करीत आहे.प्रतिष्ठाणच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशन व शिर्डी नगरपरिषद यांनी दिलेल्या नियमानुसार ध्वनिप्रदुषण मुक्त करण्यात आला आहे.