राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव, ग्रामीण पत्रकारितेला मिळणार नवा वेग!
📍 नगर प्रतिनिधी:
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि साईश्रद्धा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संजय विठ्ठल महाजन यांची भव्य निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण पत्रकार चळवळीला नवी ऊर्जा आणि बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
🎙️ संघटनेचा विश्वास, पत्रकारांसाठी नवी दिशा!
राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक पवार आणि प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांना प्राधान्य देत त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटनेचे हे पाऊल ऐतिहासिक ठरत असल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात आहे.
🌟 संघर्षातून घडलेले नेतृत्व:
पत्रकारिता आणि समाजकारणाच्या माध्यमातून सामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडणारे संजय महाजन हे पोलीस मित्र संघटना, बहुजन पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ अशा विविध संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व करत आले आहेत. शिर्डीत साईश्रद्धा प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेली पत्रकारिता आणि संकटावर मात करून नव्या जोमाने समाजकार्यात उतरलेली त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
🙌 राज्यभरातून कौतुकाची लाट:
महाजन यांच्या निवडीमुळे ग्रामीण पत्रकार संघटनेच्या कार्याला वेग येईल, पत्रकारांच्या हक्कांसाठी त्यांचा आवाज अधिक ताकदीने ऐकू येईल, असा विश्वास मान्यवर व्यक्त करत आहेत. संघर्षातून घडलेले हे व्यक्तिमत्त्व ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा देईल, असे मत पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पत्रकार संघटनेच्या कार्यात संघटनशक्ती, धाडस आणि बदलाची नवी उर्मी दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

