अजीजभाई शेख / राहाता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा MH SET 2025 मध्ये शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी सिटीस्कॅन विभागातील अनिल आप्पासाहेब पवार यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यामुळे त्यांना महाराष्ट्र व गोवा राज्यातील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता प्राप्त झाली आहे. श्री.पवार यांनी एम एस सी केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी पदवी संपादन केले असून पुढे पीएचडी संशोधन करून अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांच्या या यशामुळे जय हिंद अकॅडमी चे संचालक सुयोग सस्कर ,फिनिक्स अभ्यासिका मित्र मंडळ, अजय बत्तीसे, मेजर शंकेश पांडव, मेजर सुनील गवळी , यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
सुयोग सस्कर - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111