आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२५ अगदी तोंडावर आली आहे आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी त्यांच्या संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असेल, सुरुवातीला या आठ संघांची दोन गटात विभागणी केली आहे. त्यांच्यात साखळी गटातील सामने होतील. त्यानंतर सुपर-फोर गटाचे सामने होतील आणि यातील दोन अव्वल संघात अंतिम सामना होईल. ९ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सांगता २८ सप्टेंबरला अंतिम सामन्यानंतर होईल.
भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान गट अ मध्ये आहेत, तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग गट ब मध्ये विभागले आहेत. गट टप्प्यात प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळेल. गुणांच्या बाबतीत अव्वल दोन संघ सुपर फोरमध्ये जातील, जिथे अंतिम फेरीतील संघांचा निर्णय दुसऱ्या राउंड-रॉबिन प्रक्रियेद्वारे घेतला जाईल.
१४ सप्टेंबर रोजी दुबई येथे आशिया कप २०२५ च्या गट अ सामन्यात भारत पाकिस्तान यांच्यात स्पर्धेतील हाय होल्टेज सामना होणार असून तोच या स्पर्धेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. यानंतर या दोन पारंपारीक प्रतिद्वंद्व्यात सुपर फोरमध्ये सामना होऊ शकतो आणि जर स्पर्धेत सरस कामगिरी केली तर या दोघांत अंतिम सामनाही होऊ शकतो.
तसं बघाल तर कोणत्याही स्पर्धेत तांत्रिकदृष्टया एकच संघ विजेता ठरत असतो. मात्र सहभागी होणारा प्रत्येक संघ जिंकण्याच्या अभिलाषेनेच भाग घेत असतो. अशाच अभिलाषी प्रत्येक संघात निवडलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.
भारत : - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
पाकिस्तान : - सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफयान मोकीम.
हाँगकाँग : - यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उप-कर्णधार), झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हान मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतिक-उल-रेहमान इक्बाल, किंचित अली मोहम्मद शाह, महंमद शाह, किंचित अली, मोहम्मद शाह, मोहम्मद अरमुद शाह वासीफ, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान आणि एहसान खान.
बांग्लादेश : - लिटन कुमार दास (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदोय, झाकेर अली अनिक, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद होसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्जीद हसन, मोहम्मद हसन सकीन, मोहम्मद हसन सकीन, तन्जीद हसन, सकीन सकी
अफगाणिस्तान :- राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, दरविश रसूली, सेदीकुल्लाह अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, फरीद मलिक, नवीन-नवीन-नवीन, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अशरफ.
ओमान : - जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफियान युसूफ, आशिष ओदेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, झिकारिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, श्रीवास्ते अहमद, शकील.
श्रीलंका : - चरित असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महेश थेक्सानंद, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडु फर्नांडो, नुवानिडू, नुवानी, नुवानिडू फर्नांडो तुषारा, माथेशा पाथीराणा.
यूएई : - मुहम्मद वसीम (कर्णधार), आलिशान शराफू, आर्यांश शर्मा (यष्टीरक्षक), आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सागिर खान.
सकृतदर्शनी या संघांचं कागदावर बलाबल स्पष्ट दिसत नाही व टी२० च्या खेळात सामन्याचा कल क्षणा क्षणाला बदलत असतो ;. अशा धामधुमीत आपल्या क्षमतेचा जो संघ योग्य उपयोग करेल, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवेल व सर्वांगसुंदर खेळ करेल त्याचबरोबर कामगिरीत सातत्य राखेल तोच खऱ्या अर्थाने आशिया खंडातील २०२५ चा बाजीगर ठरेल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

