shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी पोलिस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकास केले परत

जावेद शेख / राहुरी 
राहुरी पोलिस ठाणे येथे काही इसमांनी त्यांचे मोबाईल हरवल्याची नोंद केली होती, सदर हरवलेले मोबाईल हे शोधण्याबाबत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शोध पथकास आदेशित केले होते, त्यावरून शोध पथकाने दाखल नोंदीवरून मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले आणि शोध पथकास जानेवारी २०२५ पासून आजपावेतो एकूण ४० मोबाईल शोधण्यात यश आले असून त्यातील काही मोबाईल हे त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे तसेच इतर शिल्लक मोबाईल मालक यांच्याशी संपर्क करून मोबाईलची खात्री करून त्यांना त्यांचे मोबाईल परत देण्याची कारवाई चालू आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस‌ अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस हवलदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर चे मोबाईल सेल पोलीस हवलदार सचिन धनाड, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ यांनी केलेली आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close