वाढदिवसानिमित्त विशेष लेख
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ - अमरावती जिल्ह्यातील वरुड शहर, एक वैभवशाली इतिहास आणि समाजसेवेची मोठी परंपरा लाभलेले सुसंस्कृत अशा शहराचं ठिकाण.
या शहराच्या आरोग्य क्षेत्रात एक नाव असे आहे की, जिथे केवळ उपचारच नाही, तर माणुसकी आणि दयाळूपणाही अनुभवायला मिळतो आणि ते नाव म्हणजे डॉ. आनंद झामडे.
आज डॉ. झामडे यांचा वाढदिवस ! या खास दिवशी त्यांचे कार्य, त्यांचे योगदान आणि त्यांची वैयक्तिक जीवनातील प्रेरणादायी वाटचाल यावर एक दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं ठरते
डॉ. आनंद झामडे हे दंतचिकित्सा क्षेत्रातील एक प्रखर तेजपुंज तारा आहेत. त्यांनी आपल्या शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत दंतशास्त्रात पारंगत होऊन वरुड शहरात अत्याधुनिक सेवा देणारे क्लिनिक उभारले. त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रुग्णांशी आत्मीयता यांचा सुंदर संगम आढळतो.
त्यांच्या हातून झालेले उपचार हे केवळ दातांचे दुखणे नाहीसे करत नाहीत, तर रुग्णाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची हास्यफुलं उमलवतात. दातांच्या सर्व उपचारांमध्ये त्यांनी असंख्य रुग्णांना नवा जीवनदृष्टीकोन दिला आहे. डॉ. झामडे यांचं वैद्यकीय कार्य केवळ क्लिनिकपुरतं मर्यादित नाही. त्यांनी अनेक वेळा शिबिरे, मोफत तपासण्या, गावोगाव जाऊन जनजागृती अभियान यांद्वारे समाजातील दुर्बल घटकांना आरोग्यसेवा दिली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्याचा उजेड पोहोचवणं हे त्यांनी आपलं जीवनकार्य मानलं आहे. साध्या लोकांनाही दर्जेदार उपचार मिळायला हवेत” – हा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्यासाठी ते सतत कार्यरत असतात.
सौम्य, संयमी आणि नम्र स्वभाव, नेहमी हसतमुख आणि रुग्णांचे मनोबल वाढवणारे बोल
तंत्रज्ञानाबरोबर आपलं ज्ञान सतत अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न समाजातील विविध उपक्रमात सक्रीय सहभाग डॉ. आनंद झामडे हे व्यावसायिक यशाच्या शिखरावर असूनही ते नेहमी जमिनीवर राहतात. त्यांच्यातील माणुसकी, सेवाभाव, आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो रुग्ण, मित्र, आप्तस्वकीय आणि सहकारी यांचं एकच शुभेच्छावाक्य आहे –
"डॉ. झामडे, आपण नेहमी असेच हसत राहा, निरोगी राहा आणि समाजाच्या सेवेसाठी प्रेरणादायी कार्य करत रहा!" आपण दिलेले आरोग्यदातेपणाचे योगदान समाजासाठी अमूल्य आहे. आपल्या हातून आणखी हजारो रुग्ण निरोगी होतील, हा विश्वास आणि शुभेच्छा!
संकलन : निखिल बावणे
सह संपादक : दैनिक वरुड
केसरी - वरुड जि.अमरावती
मो.नं .9325825169
*लेख प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111