shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळनेर येथे सेवा पंढरवाडा अभियान संदर्भात बैठक संपन्न

सेवा सुशासन पंधरवाडा-2025 नियोजन बैठकीत उत्स्फूर्त सहभाग 

शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )

भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सुशासन पंधरवाडा-2025 नियोजनासाठी धुळे (ग्रा.) जिल्हाध्यक्ष मा.श्री. बापुसाहेब खलाणे व जिल्हा संयोजक मा.श्री. शैलेंद्रभाऊ आजगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा-पिंपळनेर मंडलाची बैठक संपन्न झाली.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. आबासाहेब प्रदीप कोठावदे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सौ.सविताताई पगारे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख श्री. मोतीलाल पोतदार व मंडलाध्यक्ष श्री. प्रमोद (भैय्या) गांगुर्डे उपस्थित होते.

या बैठकीत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे ठरले. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, प्रबुद्ध नागरिक संमेलन, दिव्यांग सन्मान सोहळा, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचा समावेश असून हे उपक्रम संपूर्ण मंडल कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात घेण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या नियोजनात सरचिटणीस (संघटन) श्री. चंद्रशेखर बाविस्कर, सरचिटणीस श्री. अनिल जाधव, मंडल उपाध्यक्ष श्री. रविंद्र कोतकर, अमोल पाटील, सुरेश पुराणिक, हिरालाल कोठावदे, दिलीप घरटे, रविंद्र भावसार, कल्पेश कोठावदे, माजी शहराध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे, मा.पं.स. सदस्य श्री. देवेंद्र गांगुर्डे, मा.उपसरपंच श्री. विजय गांगुर्डे, तसेच श्री. विनोद कोठावदे, श्री. अनिल मुसळे, श्री. जगदीश धामणे, श्री. देवेंद्र कोठावदे, आकाश पगारे, कल्पेश नेरकर, रामकृष्ण सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवामोर्चा अध्यक्ष श्री. पंकज भावसार, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. प्रकाश अहिरराव, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष श्री. सलीम पटेल, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. योगेश गांगुर्डे, किसान मोर्चा अध्यक्ष श्री. दिनेश धायबर, शिक्षक आघाडी अध्यक्ष श्री. डी.डी. महाले सर, तसेच हेमराज दशपुते, सुरेश बागुल, अशोक ओझरकर, संजय भिलाणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे नियोजन व प्रसिद्धीप्रमुख श्री. सुरेश जगदाळे यांनी केले.
close