वडाळा महादेव [वार्ताहर] – अहमदनगर अर्बन अँड रुरल कराटे डू असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरणात पार पडली. नगर, राहुरी, शेवगाव, नेवासा, सोनई, कोपरगाव, श्रीरामपूर, नगर सिटी अशा विविध तालुक्यांतील तब्बल २३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
- स्वामिनी दरेकर
- गौरव लोणारे
- कृष्णराज वाणी
या तिघांनी आपल्या गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असून त्यांची निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित काळे, यश गुगरे, ओंकार गागरे, नीता शिंदे मॅडम, अशोक शिंदे सर यांनी पंच म्हणून मोलाची भूमिका बजावली. विजेत्यांचे आमदार श्री. संग्रामभैया जगताप, संस्थेचे अध्यक्ष श्री. जयसिंग काळे सर, सचिव अमोल काजळे सर यांनी विशेष अभिनंदन केले.
या यशामागे शाळेचे चेअरमन विरेश लबडे सर, व्हाइस चेअरमन विद्या लबडे मॅडम, प्राचार्य अर्जुन कासार सर, तसेच क्रीडा शिक्षक अशोक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
🎉 सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा!

