shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने नदीपात्र स्वच्छतेचा संदेश.

विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने नदीपात्र स्वच्छतेचा संदेश.
रा.ति. काबरे विद्यालयाच्या एनसीसी विभागाने कासोदा दरवाजा परिसरातील नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविताना.
एरंडोल – जागतिक नदी दिवसानिमित्त रा.ति. काबरे विद्यालयाच्या एनसीसी विभागाने कासोदा दरवाजा परिसरातील नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविले. ४९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कर्नल अमित रे व ले. कर्नल पिनाकी बनिक यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील कचरा व घाण बाजूला करून परिसर स्वच्छ केला.

नगरपालिकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. राठी, एनसीसी कमांडर ए.एस. वाणी, ज्येष्ठ शिक्षक डी.आर. पाटील तसेच नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.


close