shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेवा पंधरवड्यानिमित्त पिंपळे येथे वृक्षारोपण व जलपूजन कार्यक्रम संपन्न.

सेवा पंधरवड्यानिमित्त पिंपळे येथे वृक्षारोपण व जलपूजन कार्यक्रम संपन्न.

पिंपळे (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सुरू असलेला “सेवा पंधरवडा” उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपळे येथे वृक्षारोपण व जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले.

या वेळी मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, “महिला सक्षम असेल तर परिवार सक्षम होतो. राष्ट्रनेता यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंतचा सेवा पंधरवाडा हा उपक्रम प्रत्येकाने एक पेड मा के नाम लावून साजरा करावा. तसेच सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी.” पर्यावरण संवर्धनासोबतच जलसंपदा जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

या प्रसंगी कार्यक्रमास भैरवी पलांडे, डॉ. अनिल शिंदे, निंबा दला चौधरी, माजी शेतकी संघ अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, माजी उपसभापती भिकेश पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास अधिकारी हेमलता पाटील, वजाताई भिल, रेखाताई पाटील, जिजाबराव पाटील, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळे बुद्रुकचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा पाटील व सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, धरती माता महिला शेतकरी गट तसेच तिन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.


close