shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये भूलाबाई महोत्सव उत्साहात.

एरंडोलमध्ये भूलाबाई महोत्सव उत्साहात.

एरंडोल (प्रतिनिधी) – राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे सरस्वती कॉलनीत भूलाबाई महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी भूलाबाईंची गाणी व टिपरी (फेर धरून) सादर करून कार्यक्रम रंगतदार केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका शशिकला जगताप होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शोभा साळी व मीना मानुधने उपस्थित होत्या. या प्रसंगी विशेष कार्याबद्दल सौ. सुरेखा दिलीप सावंत आणि पदोन्नती मिळाल्याबद्दल श्रीमती वंदना पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

अतिथींनी महिलांच्या संगठन व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शकुंतला अहिरराव यांनी आणि आभारप्रदर्शन वंदना पाटील यांनी केले.

महोत्सवात महिलांनी विविध खेळ, गाणी, टिपरी यांचा आनंद लुटला. शेवटी भूलाबाईची आरती व स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली. महिलांची मोठी उपस्थिती या वेळी पाहायला मिळाली.

close